Wednesday, June 1, 2011

संस्कृत..........जगातील सर्वात प्राचीन भाषा

संस्कृत भाषा पृथ्वीवरील प्राचीन, समृद्ध आणि शास्त्रीय भाषा मानतात. ही भाषा हिंदू, बौद्ध, शीख आणि जैन धर्मांची उपासनेची भाषा असून ती भारताच्या २३ शासकीय राज्यभाषांपैकी एक आहे. नेपाळमध्येही ह्या भाषेला अतिशय महत्त्व आहे. या भाषेत अनेक सुभाषिते आहेत. विख्यात व्याकरणतज्ञ "पाणिनी"ने इ. स. पूर्व काळात "अष्टाध्ययी" या ग्रंथात संस्कृताची पुनर्रचना केली. संस्कृत भाषेतील शब्दांनाच भारतीय भाषांमध्ये योजले आहे. संस्कृतमधूनच इतर भारतीय भाषा जन्मल्या आहेत.

संस्कृत भाषा सुरभारती, देववाणी, देवीवाक्‌, गीर्वाणवाणी, देवभाषा, अमरभारती इत्यादी नावांनी प्रसिद्ध आहे.

ह्या भाषेत केवळ '।' हे दंडचिन्ह वापरतात अन्य कोणतेही चिन्ह या भाषेत नाही. संस्कृत भाषेस प्राप्त झालेले सर्वांत प्राचीन ग्रंथ ऋवेद हा आहे.

संस्कृत, प्राचीन भारताची आणि हिंदू धर्माची भाषा आहे. संस्कृत भाषेला देवभाषा अर्थात्‌ देववाणी, देवांची भाषा म्हणतात. संस्कृतचा अर्थ नैसर्गिक पवित्रता. संस्कृत भाषा ही सर्व भाषांचे मूळ किंवा उगमस्थान आहे हे असे मानले जाते. प्राचीन काळी आर्य लोक भारतात आले. त्यांची भाषा संस्कृत होती. या भाषेतच वेदवाङ्मय, रामायण, महाभारत, विविध शास्त्रीय ग्रंथ, काव्य, नाटके, कथा इत्यादी विपुल साहित्य निर्माण झाले. संस्कृत भाषेत अनेक शब्दांना, अनेक प्रतिशब्द आहेत, जसे पृथ्वीसाठी ६५, पाण्यासाठी ६७, तर पावसासाठी २५० प्रतिशब्द आहेत. व्याकरणकार पाणिनीने संस्कृतचे व्याकरण लिहून तिला परिपूर्ण बनविले आहे. हिंदू धर्मातील सर्व वेद, महाकाव्ये, वाड्‍मय, पूजा संस्कृतमध्ये आहेत. जवळपास सर्व भारतीय भाषांचं उगमस्थान असणार्‍या या संस्कृत भाषेत भारताचा सांस्कृतिक इतिहास आणि प्राचीन ज्ञानभांडार आहे.

ही भाषा जगातील सर्वात प्राचीन भाषा मानतात. ही भाषा एवढी समृद्ध भाषा होती की भारतीय भाषांत सर्वाधिक प्रमाणात हिचे शब्द आहेत, म्हणून भाषाकारांच्या मते ही सर्व भाषांची जननी आहे. पूर्वी संस्कृत लोकभाषा होती. लोक संस्कृतमधून संभाषण करत असत.

विश्वातील प्रथम ग्रंथ ऋग्वेद संस्कृतातच आहे. आणि इतर सर्व वेद जसे यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद संस्कृत भाषेतच आहेत